मंत्रालयात या ना त्या कामाच्या निमित्ताने यावे लागणाना प्रवेश पासासाठीच्या लावाव्या लागणाऱ्या रांगा आता इतिहासजमा होणार आहेत. सरकारने १५ जानेवारी २०१५ पासून प्रवेशासाठी ऑनलाईन पास सुविधा सुरू केली असून त्यामुळे मंत्रालयात प्रवेश मिळविण्यासाठी इच्छुक घरातूनही पास प्राप्त करून घेऊ शकणार आहेत. मंत्रालयात येणार्या लोकांना दुपारी २ नंतरच प्रवेश दिला जातो मात्र पास मिळविण्यासाठी लांबचलांब रांगेत खूप वेळ तिष्ठावे लागते. त्यासाठी मंत्रालयाच्या गेटवर परिचयपत्रासह अर्ज दाखल करावा लागतो.नंतर सुरक्षा कर्मचारी रजिस्टरमध्ये आवश्यक नोंदणी करून सहीशिक्यासह प्रवेश पास देतात. मंत्रालयात येणार्यांची सुविधा व्हावी यासाठी राज्य शासनाने https://www.maharashtra.gov.in/ या वेबसाईटवरच एक लिंक उपलब्ध करून दिली आहे. त्यात इच्छुक ऑनलाईन अर्ज भरू शकणार आहेत. त्याची प्रिंट काढून मंत्रालयात दाखविता येणार आहे. प्रिंट नसेल तर मोबाईलवरही स्क्रीन शॉट मान्य केला जाणार आहे. मंत्रालयात प्रवेश पास कौंटरची संख्याही वाढविली जाणार आहे. तसेच पास देण्याचे काम सकाळी १० पासूनच सुरू होणार आहे. प्रत्यक्ष प्रवेश मात्र सध्याच्या वेळाप्रमाणे दुपारी दोन नंतरच दिले जाणार आहेत. मंत्रालय प्रवेशासाठी ऑनलाईन पास मिळविण्यासाठी मंत्रालय अभ्यागत पास व्यवस्थापन प्रणाली येथे क्लिक करा स्त्रोत : महाराष्ट्र शासन