सर्व ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांचे लेखे/जमा-खर्च ऑनलाईन करणेकरिता सदरील प्रणाली NIC मार्फत विकसीत करण्यात आलेली आहे. उद्देश दैनंदिन लेख्यांची दररोज आज्ञावलीत नोंद करणे व लेखे अद्ययावत ठेवणे. उद्दीष्टे/फायदे विविध स्तरांवर पारदर्शकता निर्माण होते. लेख्यांची एकत्रित माहिती तात्काळ उपलब्ध होते. जमाखर्चाचे व्यवस्थापन योग्य व अचुक रितीने करण्यास मदत होते. सर्व ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांचे लेखे/जमा-खर्चाचा अहवाल अल्पावधीत सादर करण्यासाठी मदत होते. ऑनलाइन अकौंटींग स्त्रोत : ग्राम विकास विभाग