उद्देश सर्व पंचायती राज संस्थांचे (जिल्हा परिषदा, पंचायत समित्या व ग्रामपंचायती) संकेतस्थळ अद्ययावत ठेवणे व संलग्न माहिती भरणे. पंचायत प्रोफाइल मध्ये भुगोल, जनसांख्यिकी, मतदान, निवडून आलेल्या सभासदांच्या माहितींचा समावेश करणे. उद्दीष्टे/फायदे ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरांवरील नमुद केलेली माहिती उपलब्ध होते. गावांचा, तालुक्यांचा व जिल्हयाचा, पर्यटन विकास व विविध जनकल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीचे व्यवस्थापन करण्यास मदत होते. वेळेचे सुनियोजन व अल्पावधीत कार्य पुर्ण करण्यासाठी उपयोग होतो. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद स्तरांवरील सुविधा, निवडून आलेल्या सभासदांची आणि अधिकाऱ्यांची माहिती उपलब्ध होते. मराठीमध्ये उपलब्ध केलेली माहिती जगात कुठेही ऑनलाईन पाहता येते . पंचायत पोर्टल स्त्रोत :ग्राम विकास विभाग