उद्देश सर्व पंचायती राज पदाधिकाऱ्यांना ऑनलाईन कामकाजाचे प्रशिक्षण देणे. प्रशिक्षणासंबंधी विनंती स्वीकारण्याची तरतुद करणे व परिणाम विश्लेषण करणे. प्रशिक्षण पद्धतीचे वेळापत्रकाचा आढावा घेणे. प्रशिक्षण संस्था व प्रशिक्षण इच्छुक तसचे प्रशिक्षणप्राप्त व्यक्तींच्या माहितीचे संकलन करणे. प्रशिक्षण व वाचन सामुग्रीचा ऑनलाईन संकलन तयार करणे. उद्दीष्टे/फायदे सर्व पंचायती राज पदाधिकाऱ्यांना ऑनलाईन कामकाज पद्धतीची माहिती होते. संगणक हाताळणीचे व इंटरनेट वापराबाबतचे ज्ञान प्राप्त होते. वेळेचे सुनियोजन व अल्पावधीत कार्य पुर्ण करण्यासाठी उपयोग होतो. प्रशिक्षणासाठी आवश्यक त्या सर्व साधनांची उपलब्धता व अंमलबजावणी करण्यासाठी उपयोग होतो. प्रशिक्षण प्रभावीपणे राबविण्यासाठी या आज्ञावलीचा उपयोग होतो. ऑनलाईन ट्रेनिंग स्त्रोत : ग्राम विकास विभाग