कृषि विभागामार्फत माहिती तंत्रज्ञानाविषयक केंद्र/राज्य पूरस्कृत विविध प्रकल्प/उपक्रम राबविले जातात. सदरच्या प्रकल्प अज्ञावालींच्या वापरासाठी आणि माहिती अद्यावत करण्यासाठी तालुका स्तरापर्यंत संगणक साहित्याचा वापर करण्यात येत असून त्यासाठी इंटरनेटची सुविधा देखील उपलब्ध आहे.

माहिती तंत्रज्ञान वापराचे फायदे खालीलप्रमाणे

कामातील वारंवारिता टाळल्याने वेळेची बचत , एकाच ठिकाणी माहितीची उपलब्धता.

नागरिकांना online/ SMS द्वारे माहिती मिळत असल्याने पाठपुरावा / प्रवासाच्या खर्चात बचत.

इंटरनेट वापराद्वारे घरबसल्या/कोठेही माहितीची उपलब्धता.

निर्णयासाठी अद्यावत माहितीची उपलब्धता.

लाभार्थ्याच्या बँक खात्यावर अनुदान वितरणाची सुविधा.

कृषि विभागामार्फत राबविल्या जाणा-या प्रकल्प/ उपक्रमाची माहिती खालीलप्रमाणे

प्रकल्प आज्ञावल्या उदा.ई-परवाना, ई-ठिबक, क्रॉपसॅप, हॉर्टसॅप, क्रॉपवॉच, online MIS आणि पर्जन्यमापन व विश्लेषण यामुळे शेतकरी व इतर भागधारकांना महत्वपूर्ण सेवा व माहिती मिळते.

NeGPA अंतर्गत एकत्रित सेवा पुरविली जाते. ई-गव्हर्नन्स अंतर्गतचे प्रकल्प केंद्रीय कृषी पोर्टल व राज्य कृषि पोर्टल यामध्ये एकत्रित करण्याचे नियोजन आहे.

माहिती तंत्रज्ञान वापरासाठी कृषि विभागात मंडळ स्तरापर्यंत laptop तर तालुका स्तरापर्यंत संगणक प्रिंटर्स, स्कॅनर्स, kiosk यांचा वापर चालू आहे.

माहिती तंत्रज्ञान व ई-गव्हर्नन्सचे प्रशिक्षण- पायाभूत व उजळणी प्रशिक्षण देण्यासाठी राज्यात ८ प्रशिक्षण केंद्रे(वनामती ,नागपूर +७ रामेती ) असून प्रत्येक प्रशिक्षण केंद्रात २० संगणक व इंटरनेटची सुविधा उपलब्ध आहे.

रु ३.०० लाखावरील खरेदी/क्षेत्रीय कामांसाठी ई-टेडरिंग प्रणालीचा अवलंब.

सेवासुविधा पुरविण्याचे स्रोत

कृषि विभागाचे संकेतस्थळ :  www.mahaagri.gov.in

केंद्र पुरस्कृत किसान एसएमएस द्वारे शेतक-यांना मोफत सल्ला दिला जातो. यासाठी केंद्र शासनाचे www.mkisan.gov.in हे संकेतस्थळ उपलब्ध आहे.

भारतीय संचार निगम लि. व कृषि विभाग यांचे समन्वयाने MKS CUG PLAN ही मोबाईल सुविधा उपलब्ध असून त्याद्वारे शेतक-यांना अधिकारी /शास्त्रज्ञ,प्रगतीशील शेतकरी यांच्याशी थेट संपर्क साधून माहिती/ मार्गदर्शन मिळविता येते तसेच शंकानिरसन करता येते.

o इतर सुविधा पुरविण्याचे केंद्र म्हणून कृषि विज्ञान केंद्र(KVK), किसान कॉल सेंटर (१८००-१८०-१५५१), राज्य कृषि कॉल सेंटर (१८००-२३३- ४०००) व नियोजित महा–ई-सेवा केंद्र यांचा समावेश करण्यात आलेला आहे.

NeGPA अंतर्गत केंद्र कृषि पोर्टल व राज्य कृषि पोर्टल यांचे नियोजन करण्यात आलेले आहे.

स्त्रोत : http://www.krishi.maharashtra.gov.in/1127/Overview