उद्देश पंचायत राज संस्थांकडून राबविण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या योजनांची अंमलबजावणी व देखरेख करणे. ग्रामीण व शहरी गटांचा भौतीक आणि वित्तीय प्रगती अहवाल तयार करणे. कामाच्या भौतीक आणि वित्तीय प्रगतीचा आढावा घेणे. विविध मार्गे येणाऱ्या निधींचा उपयोग व नियंत्रण ठेवणे. वित्तीय आणि भौतीक प्रगती अहवालात पारदर्शकता आणणे. उद्दीष्टे/फायदे प्लॅन प्लस मध्ये तयार केलेल्या नियोजनाची अंमलबजावणी करण्यासाठी उपयोग होतो. पंचायती राज संस्थांकडुन राबविण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या योजनांच्या अंमलबजावणीवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपयुक्त आहे. ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांना अहवाल सादर करण्यासाठी उपयोग होतो. ऑनलाइन रिपोर्टिंग स्त्रोत : ग्राम विकास विभाग