माहितीशक्ती

उपलब्ध सेवा -

सार्वजनिकदृष्ट्या उपयुक्त अर्जांचे नमुने, तपासणी-सूची, निर्देशित शुल्क, अर्जावर निकाल देण्यासाठी लागणारा वेळ इ.

चालू योजनांसंबंधीची माहिती

तक्रार निवारण मंच

NOAPS (राष्ट्रीय वृद्धत्व निवृत्ति वेतन योजना) सारख्या योजनांचे अर्ज इलेक्ट्रॉनिक पद्धतीने भरण्याची सोय, पाण्याशी संबंधित तक्रारी, शिधापत्रिका

मंत्री तसेच जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकार्यांशी चॅट (इलेक्ट्रॉनिक पद्धतीने बातचीत)

१००० पेक्षा जास्त परीक्षित रक्तदात्यांची सूची (रक्तगट, पत्ता आणि दूरध्वनी क्रमांकासहित

बियाणे, खते, कीटकनाशके, औषधे, सेंद्रीय खते इ. संबंधी तपशीलवार माहिती

योग्य कारणासाठी माहिती मागणार्या कोण्याही व्यक्तीस मतदार यादी पाहण्याची सोय

दारिद्र्यरेषेखालील लोकांची सूची

ह्या सेवांचा लाभ घेण्यासाठी www.mahitishakti.net ह्यावर लॉगऑन करा.

ऑनलाइन अर्जांचे नमुने

गुजरात सरकारशी संबंधित अर्ज शोधा आणि अर्जाचा नमुना पहा

हे नमुने शोधण्यासाठी इंग्रजी आणि गुजराती अशा दोन्ही भाषांचा पर्याय उपलब्ध

ह्या सेवांचा लाभ घेण्यासाठी http://formbook.gswan.gov.in/ ह्यावर लॉगऑन करा.

सरकारी ठरावांचे (जीआर) पुस्तक ऑनलाइन

उपलब्ध सेवा -

गुजरात सरकारने केलेले ठराव शोधणे आणि पाहणे

हे ठराव शोधण्यासाठी इंग्रजी आणि गुजराती अशा दोन्ही भाषांचा पर्याय उपलब्ध

आपल्या संगणकावरील फेवरिट्समध्ये म्हणजे पसंतीच्या फोल्डरमध्ये सर्वसाधारणपणे वापरले जाणारे ठराव सामील करण्याची सोय

ह्या सेवांचा लाभ घेण्यासाठी http://grbook.gswan.gov.in/frahome.asp ह्यावर लॉगऑन करा.

गुजरातची ज्ञानपेढी

उपलब्ध सेवा -

आपण गुजरात सरकारला काही सूचना करू इच्छित असल्यास आपल्या सूचना आणि सल्ले पोस्ट करा (इ-मेलने पाठवा)

दर महिन्याला होणार्या चर्चा-मंचामध्ये भाग घेऊन, त्या महिन्यासाठी ठरवलेल्या विषयावर, सरकारमधील तज्ञांशी चर्चा करा

त्या महिन्यासाठी ठरवलेल्या विषयाच्या संबंधीची आपली सूचना मान्य झाल्यास आपणांस ह्या मंचामध्ये सहभागी होण्याचे निमंत्रण येईल.

ह्या सेवांचा लाभ घेण्यासाठी www.gujaratbankofwisdom.com ह्यावर लॉगऑन करा.

रोजगार विनिमय केंद्रामध्ये ऑनलाइन नोंदणी

उपलब्ध सेवा -

ऑनलाइन नोंदणीची सोय

जाहिरातींसंबंधीची माहिती

प्रशिक्षण कार्यक्रमांची माहिती

रोजगाराच्या सद्यस्थितीची ऑनलाइन तपासणी

रोजगार वार्ता आणि मार्गदर्शन

ह्या सेवांचा लाभ घेण्यासाठी कृपयाhttp://www.talimrojgar.org/Scripts/AddCandidateRegB.asp ह्यावर लॉगऑन करा.

इ-शहर (एएमसी)

उपलब्ध सेवा -

६ नागरी सेवा केंद्रांमधील कोणत्याही खिडकीवरून खालील नागरी सेवांसंबंधीची सर्व माहिती मिळू शकते -

जन्म आणि मृत्यूची नोंदणी

इमारतींचे नकाशे

प्राथमिक आरोग्य आणि शिक्षण

शहराची स्वच्छता

पाणीपुरवठा

मलनिःस्सारण आणि रस्ते

रस्त्यावरील दिवे

बगीचे आणि उद्याने

सुविधांपोटीच्या करांचा भरणा

आवश्यक कागदपत्रे, अर्ज आणि इतर मदतीसाठी मदत-केंद्र

नागरिकांच्या सोयीसाठी कार्यालयीन कामाची वेळ संपल्यानंतरदेखील सुविधा उपलब्ध
ह्या सेवांचा लाभ घेण्यासाठी कृपया www.egovamc.com ह्यावर लॉगऑन करा.
जन सेवा केंद्र

उपलब्ध सेवा -

९० प्रकारच्या विविध नागरी सेवा, ४४ विविध प्रकारची प्रतिज्ञापत्रे आणि इतरही अनेक मूल्यवर्धित सेवा.

ह्या सेवांमध्ये जमिनीसंबंधीचे व्यवहार, पुरवठ्याशी संबंधित बाबी, महसुलाची वसुली, परवाने देणे, प्रमाणपत्रे देणे, माहितीच्या अधिकारासंबंधीची प्रकरणे आणि प्रतिज्ञापत्रांचा समावेश आहे.

पूर्तता केलेली कागदपत्रे घरपोच देणे

अपंग, अशिक्षित अथवा ज्येष्ठ नागरिकांना विशेष सहाय्य

नागरिक एसएमएस पाठवून आपल्या प्रकरणाची स्थिती तपासू शकतात

स्थितीची ऑनलाइन तपासणी आणि अर्ज डाउनलोड करणे

२४ तास, सातही दिवस दूरध्वनीवरून स्वयंचलित सेवा

ह्या सेवांचा लाभ घेण्यासाठीwww.jansevakendragnr.gujarat.gov.in ह्यावर लॉगऑन करा.

इ-धारा

उपलब्ध सेवा -

जमिनीच्या नोंदींच्या संगणकीकृत प्रती

शेतकर्यांना नोंद-अधिकार (राइट ऑफ रेकॉर्ड) जारी करणे

फेरफाराच्या नोंदी

जमीन-वापर, घेतलेली पिके, पाण्याचा स्रोत, बसवलेली विजेवरील यंत्रे, झाडे इ. ची तपशीलवार माहिती

ह्या सेवांचा लाभ घेण्यासाठीह्यावर लॉगऑन करा.

कागदपत्रांची नोंद करणे

उपलब्ध सेवा -

विलेखांची नोंदणी

महसुलाची वसुली

मालमत्तेचे मूल्यांकन

दस्तऐवज जतन करणे

व्यवहारांचा शोध घेणे

ह्या सेवांचा लाभ घेण्यासाठी http://revenuedepartment.gujarat.gov.in/index.asp ह्यावर लॉगऑन करा.

स्वागत
(तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांच्या तक्रारींवर राज्यस्तरावर लक्ष वेधणे)
स्वागत हा एक नावीन्यपूर्ण उपक्रम असून ह्यामुळे गुजरात राज्याचे नागरिक आणि मुख्यमंत्री यांच्या दरम्यान थेट संवाद होऊ शकतो.

गांधीनगरमध्ये प्रत्येक महिन्याचा चौथा गुरुवार म्हणजे स्वागत-दिन असतो आणि ह्यादिवशी अगदी सामान्यातील सामान्य नागरिकाची तक्रार प्रशासनामधील सर्वोच्च अधिकार्याकडून ऐकली जाते. ह्यामध्ये -

तक्रार लॉगइन केल्यानंतर ती संबंधित अधिकार्यांना ऑनलाइन उपलब्ध करून दिली जाते आणि त्यावर त्यांनी ३-४ दिवसांत उत्तर देणे अपेक्षित असेत.

संबंधित खात्याला दुपारचे ३ वाजण्यापूर्वी आपले उत्तर तयार ठेवावे लागते कारण त्यावेळी, व्हिडिओ-कॉन्फरन्स तंत्राचा वापर करून, मुख्यमंत्री सर्व संबंधित जिल्ह्यातील लोकांशी बोलतात.

एकावेळी एक ह्याप्रमाणे सर्व अर्जदारांना बोलावले जाते आणि मुख्यमंत्री प्रत्येक तक्रारीमध्ये काळजीपूर्वक लक्ष घालतात.

संबंधित खात्याने पाठवलेली माहिती देखील तक्रारदाराच्या समक्षच तसेच जिल्हाधिकारी/जिल्हा विकास अधिकारी/पोलीस अधीक्षक/इतर संबंधित अधिकार्यांच्या उपस्थितीतऑनलाइन पाहिली जाते.

तक्रारीवर वाजवी आणि मान्य होण्याजोगे उत्तर त्याच दिवशी शोधले जाते. एकाही तक्रारदाराला ठोस उत्तराशिवाय हात हलवीत परत पाठवले जात नाही.

इ-ग्राम विश्व ग्राम प्रकल्प

विश्व ग्राम प्रकल्पाचे “इ-ग्रामपंचायत देखरेख प्रणाली” हे एकक खेड्यामधील कुटुंबांच्या माहितीची नोंद करण्यासाठी आणि गरजेप्रमाणे प्रमाणपत्रे जारी करण्यासाठी बनवले आहे.

हे एकक खेड्यातील प्रत्येक कुटुंबाच्या सर्वेक्षणाच्या माहितीवर आधारित आहे. ह्यामध्ये प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक सदस्याची तपशीलवार माहिती आहे आणि ह्या माहितीवरून विविध प्रमाणपत्रे जारी केली जातात. उदाहरणार्थ -

उत्पन्न, जात, निवासस्थान, जन्म, मृत्यू, चारित्र्य, दारिद्र्यरेषेखाली असणे इ.

प्रत्येक कुटुंबाच्या मालमत्तेची देखील तपशीलवार माहिती ठेवली जाते ज्यायोगे गरजेप्रमाणे प्रमाणपत्रे जारी करणे आणि मालमत्तेनुसार पंचायत कर गोळा करणे शक्य होते.