वेबसाईट : महारोजगार आमचा दृष्टीकोन युवकांना नोकरीकरिता सहाय्य आणि स्वयंरोजगाराकरिता मार्गदर्शन करुन त्यांचे राहणीमान उंचावण्यासाठी व उत्पन्न वाढविण्यासाठी त्यांना उद्युक्त करणे. आमचा उद्देश उमेदवारांना आश्वासित, पारदर्शक व विकेंद्रित रोजगार, स्वयंरोजगारांची सेवा ई-प्रशासनाच्या माध्यमातून मिळवून देणे, उमेदवारांची रोजगार मिळवण्याची क्षमता वाढविणे, उद्योजकांना रोजगार व स्वयंरोजगार विभागांतर्गत उमेदवार घेण्यासाठी उद्युक्त करणे व त्याव्दारे युवकांचा सामाजिकस्तर वाढविणे. आमचे कार्य बेरोजगार उमेदवारांची नोंदणी करणे व त्यांना नोकरी मिळविण्यासाठी मदत करणे. एसएमएस व्दारे उमेदवारांना नोकरी, व्यवसायाबाबत सूचित करणे. उद्योजकांची नोंदणी करणे आणि त्यांना त्यांचे मागणीनुसार पात्र रोजगारईच्छूक उमेदवार पुरविणे. सेवायोजन क्षेत्र माहिती स्वयंरोजगार - व्यावसायिक माहिती. व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम कौशल्य विकास कार्यक्रम रोजगार मेळावे आदिवासी युवकांसाठी प्रशिक्षण सेवायोजन कार्यालये (रिक्त पदे सक्तीने अधिसूचित करणे.) कायदा १९५९ ची अंमलबजावणी सेवा सोसायटी असंघटीत क्षेत्रातील सेवा देणा-या व सेवा घेणा-यासाठी पाठबळ व मदत देणे. अंपग उमेदवारांसाठी विशेष रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्रे करियर लायब्ररी स्त्रोत : महाराष्ट्र शासन