वेबसाईट : नुट्रीशनमहा राज्यातील बालकांचे योग्य रितीने पोषण व्हावे यासाठी मिशन स्थापन करण्याचा निर्णय घेणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. राजमाता जिजाऊ माता-बाल आरोग्य व पोषण मिशनची स्थापना सन 2005 साली करण्यात आली. पहिला टप्पा पाच वर्षाचा होता. मिशनचा दुसरा टप्पा सन नोव्हेंबर 2011 मध्ये सुरु करण्यात आला आहे. बाळाच्या जीवनातील पहिल्या 1000 दिवसावर (स्त्री गरोदर राहिल्यापासून ते बाळ 2 वर्षापर्यंतचे होईपर्यंतचा काळ) यावर विशेष लक्ष केंद्रीत करण्याबाबत महाराष्ट्र कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी राजमाता जिजाऊ माता-बाल आरोग्य व पोषण मिशनने हे आपले ध्येय ठरविले आहे. प्रशासकिय सुलभतेसाठी मिशन हे महिला व बाल विकास विभागाच्या अंतर्गत असले तरी मिशन हे एक तांत्रिक माहिती व सल्ला देण्यासाठी स्वायत्त संस्था आहे. मिशनला संपुर्ण अनुदान हे युनिसेफ सहाय्यीत आहे. प्रामुख्याने आरोग्य विभाग, एकात्मिक बाल विकास सेवा योजना व इतर संबंधीत विभाग यांच्यात समन्वय निर्माण करणे व योग्य संवाद घडवून आणून बालकांचे पोषण शास्त्रीय पध्दतीने करणे. हे मिशनचे ध्येय आहे. IIPS, मुंबई या संस्थेने नुकताच पोषण सर्वेक्षण (CNSM-2012) केलेला आहे. यातून असे आढळले आहे की, महाराष्ट्रात गेल्या 6 ते 7 वर्षात मिशन पध्दतीने जे कार्य करण्यात आलेले आहे त्यातून बालकांच्या पोषणात चांगली प्रगती झालेली आढळलेली आहे. विशेषत: 2 वर्षाच्या आतील बालकांमध्ये कुपोषणाच्या प्रमाणात मोठया प्रमाणात घट झालेली आढळून आलेली आहे. हे सर्व राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, एकात्मिक बाल विकास सेवा योजना व इतर संबंधीत विभाग व मिशन यांच्या एकत्रित प्रयत्नाने घडून आलेले आहे. नुकत्याच झालेल्या पोषण सर्वेक्षण सन 2012 नुसार गेल्या 6 जे 7 वर्षातील प्रयत्नामुळे बालकांच्या पोषणात चांगली सुधारणा झालेली आहे. यातूनच पुढील कार्यासाठी प्रेरणा मिळते. स्त्रोत : महाराष्ट्र शासन