नोंदणी व मुद्रांक विभाग , महाराष्ट्र शासन नोंदणी व मुद्रांक विभागाच्या या बोधचिन्हात ‘ नो’ व ‘मु’ या अक्षरांना स्वस्तिकाकृतीत स्थित करण्यात आले आहे.या बोधचिन्हात, गती असलेल्या लोकाभिमुख सेवेची हमी देणारी मोहोर चित्रित केली आहे. यातून खालीलप्रमाणे सेवा देण्याची बांधिलकी सूचित करण्यात आली आहे. i. सुलभ व तत्पर लोकसेवा ii. ठराविक कालमर्यादेत कार्यपूर्ती iii. पारदर्शक कार्यप्रणाली iv. सर्वांना सौजन्याची व समान वागणूक v . लोकाभिमुख बैठक व्यवस्था vi. प्रसन्न कार्यालयीन वातावरण संदर्भ : नोंदणी व मुद्रांक विभाग , महाराष्ट्र शासन