डिजिटल इंडिया ह्या उपक्रमाचे उद्दिष्ट प्रामुख्याने तीन क्षेत्रांवर केंद्रित आहे प्रत्येक नागरिकासाठी मुख्य उपयोगी घटक म्हणून डिजिटल पायाभूत सुविधा देऊ करणे प्रशासन व मागणीनुसार सेवा नागरिकांचे डिजिटल माध्यमाद्वारे सशक्तीकरण प्रत्येक नागरिकासाठी उपयोगी घटक म्हणून डिजिटल पायाभूत सुविधा नागरिकांना सेवा देण्यासाठी मुख्य उपयोगी घटक म्हणून अतिवेगवान इंटरनेट उपलब्ध करुन देणे जन्मापासून मृत्यूपर्यंत डिजिटल ओळख जी प्रत्येक नागरिकासाठी वैशिष्ट्यपूर्ण, आयुष्यभरासाठी, ऑनलाईन व प्रमाणीकरण करण्यायोग्य असेल डिजिटल व आर्थिक क्षेत्रामध्ये नागरिकांचा सहभाग समर्थ करणारे मोबाईल फोन व बँक खाते सामाईक सेव केंद्र सहजपणे उपलब्ध होणे सार्वजनिक क्लाउडवर वापरण्यायोग्य खाजगी स्पेस सुरक्षित व अभेद्य सायबर-स्पेस प्रशासन व मागणीवर आधारित सेवा विविध विभाग किंवा कार्यक्षेत्रांमध्ये अखंडपणे एकत्रित सेवा ऑनलाईन व मोबाईल प्लॅटफॉर्मवरुन वास्तविक वेळेत सेवा उपलब्ध होणे सर्व नागरिकांचे अधिकार वहनीय असतील व क्लाउडवर उपलब्ध होतील व्यवसाय करण्यातील सहजता सुधारण्यासाठी डिजिटलदृष्ट्या सुधारित सेवा आर्थिक व्यवहार इलेक्ट्रॉनिक स्वरूपात व रोखरहित बनविणे निर्णय सहाय्यक यंत्रणा व विकासासाठी भूअवकाशीय माहिती यंत्रणेचा (जीआयएस) उपयोग करुन घेणे नागरिकांचे डिजिटल माध्यमाद्वारे सशक्तीकरण सार्वत्रिक डिजिटल साक्षरता सार्वत्रिक उपलब्ध डिजिटल संसाधन भारतीय भाषंमध्ये डिजिटल संसाधने/सेवांची उपलब्धता सहभागात्मक प्रशासनासाठी सहाय्यक डिजिटल प्लॅटफॉर्म नागरिकांना व्यक्तिशः हजर राहून सरकारी दस्तऐवज/प्रमाणपत्रे सादर करावी लागत नाहीत स्त्रोत -डिजिटल इंडिया