मुक्त डाटा प्लॅटफॉर्म http://data.gov.in (दुवा बाहेरचा आहे) खुल्या डाटा प्लॅटफॉर्म मंत्रालयांद्वारे/विभागांद्वारे खुल्या प्रारुपातील डाटासंच प्रसारित करण्यास मदत करतो ज्यांचा वापर, फेरवापर व फेरवितरण करता येते. माहिती व दस्तऐवज ऑनलाईन प्रकाशित केल्यामुळे नागरिकांना मुक्तपणे व सहजपणे माहिती उपलब्ध होईल. शासन सर्व सामाजिक माध्यमातून सक्रियपणे संपर्क साधेल सरकार माहिती देण्यासाठी व नागरिकांशी संवाद साधण्यासाठी सक्रियपणे सामाजिक माध्यमांद्वारे व वेब आधारित प्लॅटफॉर्मद्वारे संपर्क करेल. MyGov.in, पंतप्रधानांनी २६ जुलै, २०१४ रोजी नागरिकांना प्रशासनात सहभागी करुन घेण्यासाठी सरकारला कल्पना/सूचनांची देवणाघेवाण करण्यासाठीचे माध्यम म्हणून एका मंचाची स्थापना केली. तो चांगल्या प्रशासनासाठी नागरिक व सरकारदरम्यान दुहेरी संपर्क साधण्यास मदत करेल. ऑनलाईन संदेश पाठविणे नागरिकांना विशेष प्रसंगी/कार्यक्रमांच्या वेळी ऑनलाईन संदेश पाठविण्यासाठी ईमेल व एसएमएसमुळे मदत होईल. खुला डाटा प्लॅटफॉर्म, सामाजिक माध्यमाचा वापर व ऑनलाईन संदेश खुला डाटा प्लॅटफॉर्म, सामाजिक माध्यमाचा वापर व ऑनलाईन संदेश पाठवण्यासाठी प्रामुख्याने सध्याच्या पायाभूत सुविधा वापरल्या जातील व त्यासाठी मर्यादित अतिरिक्त संसाधनांची गरज लागेल. स्त्रोत : डिजिटल इंडिया