विविध सरकारी क्षेत्रांमध्ये सरकारी सेवांचे वितरण अधिक प्रभावीपणे करण्यासाठी, माहिती तंत्रज्ञानाचा वापर करुन सरकारी प्रक्रियांची फेररचना करणे व सरकारी प्रक्रिया अधिक कार्यक्षम करणे, अमूलाग्र बदलासाठी अतिशय महत्वाचे आहे व म्हणूनच सर्व मंत्रालयांमध्ये/विभागांमध्ये त्यांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. तंत्रज्ञानाद्वारे शासन प्रणालीत सुधारणा घडविण्यासाठीची मार्गदर्शक तत्त्वे पुढीलप्रमाणे आहेत अर्जाचे सरलीकरण करणे व आवश्यक माहितीच भरणे – अर्ज अतिशय सोपे केले व वापरणाऱ्यासाठी अनुकूल केले पाहिजे व केवळ किमान व आवश्यक माहितीच गोळा केली जावी. ऑनलाईन अर्ज व त्याची सद्यःस्थिती - ऑनलाईन अर्ज व त्यांच्या स्थितीचा मागोवा घेण्याची तरतूद. ऑनलाईन संग्रहालय - ऑनलाईन संग्रहालयांचा वापर प्रमाणपपत्रे, शैक्षणिक पदव्या, ओळख दस्तऐवज इत्यादींसाठी करण्याचा आदेश दिला पाहिजे म्हणजे नागरिकांना हे दस्तऐवज प्रत्यक्ष स्वरुपात सादर करण्याची गरज नाही. सेवा व प्लॅटफॉर्मचे एकत्रिकरण – सेवा व प्लॅटफॉर्मचे एकत्रिकरण उदा. भारतीय विशेष ओळख प्राधिकरणाचा आधार प्लॅटफॉर्म (युआयडीएआय), पेमेंट गेटवे, मोबाईल सेवा प्लॅटफॉर्म, खुल्या अप्लीकेशन प्रोग्रॅमिंग इंटरफेसेस (एपीआय) व राष्ट्रीय व राज्य सेवा वितरण गेटवे (एसएसडीजी/एसएसडीजी) यासारख्या मिडलवेअरद्वारे डाटाची देवाणघेवाण करण्याचे आदेश दिले पाहिजेत, ज्यामुळे नागरिकांना व व्यवसायांना एकत्रित व आंतरसक्रिय सेवा वितरण करता येईल. सर्व डाटाबेस व माहिती इलेक्ट्रॉनिक स्वरुपात असली पाहिजे व हस्तलिखित स्वरुपात नाही. सरकारी विभागांतर्गत व संस्थांमधील कामाचा प्रवाह स्वयंचलित असला पाहिजे ज्यामुळे सरकारी प्रक्रिया कार्यक्षम होतील व नागरिकांना या प्रक्रिया पाहताही येतील. माहिती तंत्रज्ञानाचा वापर सध्याच्या समस्या ओळखण्यासाठी व त्यांचे निराकरण करण्यासाठी, डाटा स्वयंचलित करण्यासाठी, प्रतिसाद देण्यासाठी व विश्लेषण करण्यासाठी केला पाहिजे. या प्रामुख्याने प्रक्रिया सुधारणा असतील. स्त्रोत : डिजिटल इंडिया कार्यक्रम संकलन : छाया निक्रड