डीजीटल इंडिया - भारत सरकारचा महत्वकांक्षी कार्यक्रम डिजिटल इंडिया, भारत सरकारचा एक महत्वकांक्षी कार्यक्रम "डिजिटल तंत्रज्ञानानेयुक्त आणि माहितीने परिपूर्ण समाज व ज्ञानाधीष्ठित अर्थव्यवस्था असलेला डिजिटल सक्षम भारत निर्माण करणे हे ध्येय आहे. आयटी Indian Talent (भारतीय प्रतिभा) + Information Technology (माहिती तंत्रज्ञान) = Future India (उद्याचा भारत). डिजिटल इंडिया कार्यक्रमाचे उदिष्ठ इलेक्ट्रॉनिक सेवा, उत्पादने, रोजगार/नोकरीइ.मधील संधी निर्माण करणे होय. डिजिटल इंडिया कार्यक्रमाचे ध्येय हे तीन कळीच्या क्षेत्राभोवती केंद्रित आहे:- "प्रत्येक नागरिकाकरिता उपयुक्त पायाभूत सुविधा" "मागणी नुसार प्रशासन व सेवा" "डिजिटल दृष्टया सक्षम नागरिक" हा कार्यक्रम विविध केंद्रीय मंत्रालये / विभाग आणि राज्य सरकारच्या सहकार्याने इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञानविभाग(DeitY) द्वारे समन्वित करण्यात आला आहे. डिजिटल इंडिया - सप्ताह उद्दिष्ट सीएससी सामाइक सेवा केंद्र / डाक कार्यालये, शाळा, ग्राम पंचायत इ. संस्थांच्या माध्यमातून लोकांमध्ये माहिती, शिक्षण आणि सहभागाद्वारे कार्य करणे. सर्व नेटीझन्सला डिजिटल मीडिया मोहिम आणि उपक्रमांच्या माध्यमातून सहभागी करणे. कार्यक्रमाचे Vision(दिव्य दृष्टी) , सेवा आणि फायदे याबद्दल माहिती करून देणे. विद्यमान ई-सेवा, विविध योजना, नियोजित कार्यक्रम आणि नाविन्यपूर्ण सेवा सुरु करण्याकरिता लोकाभिमुख करणे. डीजीटल इंडिया सप्ताह दरम्यान डिजिटल पायाभूत सुविधा, सायबर साक्षरता, सायबर सुरक्षा, सायबर हायजीन, इ बाबतची नागरिकांमध्ये कार्यात्मक साक्षरता निर्माण करणे. डिजिटल भारत कार्यक्रमाविषयी नागरिकांमध्ये प्रेरणा, उत्तेजन आणि त्यामधील सहभाग निश्चित करणे. डिजिटल इंडिया सप्ताह कार्यक्रम डिजिटल इंडियासप्ताह कार्यक्रमाची सुरुवात 1 जुलै, 2015 रोजी नवी दिल्ली येथे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. त्या दरम्यान नवीन उत्पादने आणि डिजिटल लॉकरसारख्या ई-सेवांचा प्रारंभ करण्यात येणार आहे. 1 जुलै पासून डिजिटल इंडिया साप्ताह कार्यक्रमांतर्गत नागरिकांना प्रभावीपणे संदेश वितरीत करण्यासाठी देशभरात जागरूकता आणि संवाद यांचा समावेश कार्यक्रमात आयोजन करण्यात येणार आहे. डिजिटल इंडिया कार्यक्रमाच्या परिवर्तनाचा परिणाम,सामान्य लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी विविध स्तरांवर जसे गाव, तालुका , नगरपालिका, उपविभाग, जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावरघेण्यात येणार आहे. डिजिटल इंडियाकार्यक्रमांतर्गत नागरिकांना माहिती आणि शिक्षण देण्याचे सामाईक सेवा केंद्र, डाक कार्यालये, शाळा, ग्रामपंचायत इत्यादीच्या माध्यमातून आयोजन करण्यात येणार आहे. या डीजीटल ड्राइव्हमध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावे आणि समाजाला डीजीटल सक्षम करावे. संबधित संसाधने : डिजिटल इंडिया सप्ताहाचा भाग म्हणून सुरु होणारी उत्पादने सी-डॅक हैद्राबाद चे एंड पाँइट सुरक्षा उपाय माहिती सुरक्षा जागृती पोर्टल सी-डॅक ची उत्पादने आणि सेवा