कॅशलेस (रोकडरहित) व्यवहाराचे फायदे खालीलप्रमाणे आहेत रोकडरहित व्यवहार करणे सुलभ आणि सोयीचे असते. तसेच ते रोख रक्कम हाताळण्यापेक्षा अधिक सुरक्षितही असते. रोकडरहित व्यवहारांद्वारे अर्थव्यवस्था अधिक प्रगत व विकसित होते, आणि रक्कम प्रदान प्रणाली अत्याधुनिक करता येते. त्याचप्रमाणे, रोकडरहित व्यवहारांमुळे अर्थव्यवस्थेत अधिक पारदर्शकता आणि उत्तरदायित्व स्थापित करणे, आर्थिक व्यवहारांच्या प्रक्रियेचे मूल्य कमी करणे, आणि समांतर व बेकायदेशीर अर्थव्यवस्थेचे निर्मुलन करणे, यांसारखे महत्वाची परिवर्तने करणे शक्य होते. व्यापारी वर्गाला त्यांच्या भौगोलिक कक्षांच्या पलीकडे जाऊन व्यापार करणे शक्य होते, त्यांच्या व्यवसायातील ग्राहकांची संख्या वाढवता येते, आणि त्याद्वारे व्यवसायाची वृद्धी करता येते. कागदी चलन छापण्याची आवश्यकता कमी झाल्यामुळे कागदाची मागणीत घट होते, परिणामतः कमी झाडे कापली जातात, आणि त्यामुळे साहजिकच पर्यावरण संरक्षणाला आणि संवर्धनाला मोठा हातभार लावता येतो. ग्रामीण अर्थव्यवस्था विकासाला हातभार लावता येतो, अर्थातच ग्रामीण जनतेच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते. स्रोत : निती आयोग