परिचय बँक प्रतिनिधी किंवा मायक्रो-एटीएम च्या माध्यमातून व्यवहार करण्याची सुविधा आधार प्रणित प्रणालीद्वारे मिळते. AEPS चा लाभ घेण्यासाठी आपले आधार कार्ड बँकेच्या खात्याशी सलंग्न असायला हवे या प्रणाली मार्फत व्यवहार करताना आपल्याला कोणताही पासवर्ड लक्षात ठेवण्याची गरज नाही. प्रणाली मार्फत मिळणाऱ्या सेवा खात्यावरील रकमेची चौकशी रक्कम काढणे रक्कम भरणे आधार ते आधार रक्कम ट्रान्सफर करणे आधार प्रणित प्रणालीमध्ये व्यवहार कसा कराल आपल्या नजीकच्या Micro-ATM किंवा बँक प्रतिनिधीला भेट द्या आपल्या बँकेचे नाव आणि १२ अंकी आधार कार्ड नंबर सांगा जो व्यवहार करायचा तो निवड जसे - खात्यावरील रकमेची चौकशी करणे, रक्कम काढणे, रक्कम भरणे किंवा आधार ते आधार रक्कम ट्रान्सफर करणे स्कॅनर वर आपले फिंगर प्रिंट स्कॅन करा व्यवहार पूर्ण झाल्यावर आपल्याला व्यवहाराची पावती मिळेल. कॅशलेस महाराष्ट्राच्या यशोगाथा पाहण्यासाठी महाराष्ट्र डिजिधन जागृतता कार्यक्रमाच्या (अवेअरनेस प्रोग्रॅमच्या) फेसबुक पेजला भेट द्या त्यासाठी येथे क्लिक करा महाराष्ट्र डिजिधन अवेअरनेस प्रोग्रॅम स्त्रोत- http://www.digidhan.info/#